Home अहमदनगर अहमदनगर: मतीमंद तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत

अहमदनगर: मतीमंद तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत

abused on mentally retarded girl, accused arrested

Ahmednagar | Rahuri | राहुरी: एक २० वर्षीय  मतीमंद मुलगी  घरात एकटी असल्याचा फायदा घेत एकाने घरात घुसून बळजबरीने अत्याचार (abused) केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली. दिनांक २६ जून रोजी ही घटना घडली. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.

राहुरी तालुक्यातील  एका गावात ती 20 वर्षीय मतीमंद मुलगी तिच्या आई वडिलां सोबत राहते. दिनांक 26 जून रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान ती पिडीत मतीमंद मुलगी घरात एकटीच होती. तेव्हा तिच्या वडिलांच्या ओळखीचा नानासाहेब सुखदेव बर्डे, (वय 20 वर्षे, राहणार बारागांव नांदूर रोड, राहुरी) हा मासे विकणारा आरोपी तेथे गेला. त्याने त्या मुलीला विचारले तूझी मम्मी घरी आहे का? मुलीने नाही म्हणताच नानासाहेब बर्डे याने घरात घूसून अत्याचार केला.

त्या मुलीचे आई वडील घरी आल्यावर त्यांना घडलेला प्रकार सांगितल्याने  त्यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्या पिडित मतीमंद मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दाखल केली . त्या फिर्यादीवरून नानासाहेब सुखदेव बर्डे, (रा.बारागाव नांदूर रोड, राहुरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राप्रकारणी आरोपीला ताबोडतोब अटक केली आहे. या घटनेचा अधिक  तपास पोलिस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे हे करीत आहेत.

Web Title: abused on mentally retarded girl, accused arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here