Home महाराष्ट्र Accident भीषण अपघात:  सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Accident भीषण अपघात:  सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

accident 5 members of Sushant Singh Rajput's family die

Accident: एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराहून घरी परतत असताना झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात  ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बिहारमधील लखीसराय येथे घडला. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी ५ जण हे बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील सिंकदरा-शेखपुराजवळील राष्ट्रीय महामार्गावरील हलसी पोलीस ठाणे क्षेत्रातील पिपरा गावाजवळ हा अपघात घडला. आज (१६ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.. भरधाव ट्रकने सुमोच्या गाडीला दिलेल्या भीषण धडकेमुळे हा अपघात घडला. यात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण हे गंभीर जखमी झाले. दरम्यान सध्या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त सुमोमध्ये जवळपास १० जण होते. जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सगदहा भंडारा गावात गेले होते. त्या ठिकाणी राहणारे लालजीत सिंग यांची पत्नी गीता देवी यांच्या अंत्यसंस्काराला यांनी उपस्थिती लावली. या अंत्यसंस्काराहून परतत असताना सिंकदरा-शेखपुराजवळील राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या सुमो गाडी आणि ट्रकमध्ये धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, सुमोचा पुढचा भाग अक्षरश: चक्काचूर झाला. यात ६ लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकीचे ४ जण जखमी झाले.

Web Title: accident 5 members of Sushant Singh Rajput’s family die

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here