Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: घाटात लष्करी सैनिकाची गाडी पलटी- Accident

अहमदनगर ब्रेकिंग: घाटात लष्करी सैनिकाची गाडी पलटी- Accident

Parner Accident News:  चास कामरगाव घाटात लष्कराची सैनिक असलेली गाडी पलटी, अपघातात सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत.

Accident army soldier's car overturned in the ghat

पारनेर: अहमदनगर पुणे महामार्गावर आज मंगळवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास चास कामरगाव घाटात लष्कराची सैनिक असलेली गाडी पलटी झाल्याची घटना घडली आहे. सैनिकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.  

याबाबत नगर तालुका पोलिसांनी माहिती दिली की, सदर सैनिकी जवान पुण्यावरुन नगरच्या दिशेने जात असतांना चास कामरगाव घाटात श्वान आडवे आले. जवानांच्या गाडी चालकाने त्या श्वानांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु घाट उतार रस्ता व गाडीला असलेला वेग व वळण यामुळे गाडी पलटी झाली.

घटनेची माहिती कळताच नगर तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रूग्णवाहीका व क्रेन ही ताबडतोब कामरगाव घाटात पाठवले. सर्व सैनिक सुखरूप बाहेर निघाले. त्यांना काही प्रमाणात जखमा झाल्या असुन त्यांना नगरला रुग्णालयात दाखल केले असुन सर्व सैनिक सुरक्षित आहेत. अहमदनगर-पुणे महामार्गावर अपघात मालिका चालुच असुन मंगळवारी नारायणगव्हाण ता.पारनेर व चास कामरगाव ता. नगर येथे दोन ठिकाणी अपघात झाले.

Web Title: Accident army soldier’s car overturned in the ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here