Accident: महामंडळाची बस थेट घुसली घरात अन मग
अहमदनगर | Accident: नगर जामखेड रोडवर सारोळाध्दी येथे राज्य परिवहन मंडळाची बस थेट एका घरात घुसल्याची घटना घडली आहे. आज सकाळी हा अपघात घडला.
मुरुमाचा डंपर बसला अचानक आडवे आल्याने हा अपघात घडला. या अपघातात या घराचे मोठे नुकसान झाले आहे. बस घरात घुसल्यानंतर घराचे पाईप पत्रे बस चालकाच्या कानाजवळून गाडीत शिरले. दैवबलात्तर म्हणून चालकास काही झाले नाही. यावेळी वेगळा अनुभव चालकास आला.
Web Title: Accident bus entered the house directly and then