Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: कारची दुचाकीला धडक, एक ठार

अहमदनगर ब्रेकिंग: कारची दुचाकीला धडक, एक ठार

Ahmednagar Rahuri Accident: कारची दुचाकीला पाठीमागून धडक, एक जण ठार झाल्याची घटना, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल.

Accident Car collides with two-wheeler, one killed

राहुरी:  राहुरी शनिशिंगणापूर रोडवर ब्राह्मणी येथील पेट्रोलपंपासमोर मोटारसायकलला पाठीमागून येऊन स्विफ्ट गाडीने धडक दिल्यामुळे ब्राह्मणी येथील विठ्ठल शहाराम गायकवाड हे मयत झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुरी-शिंगणापूर रोडवर पेट्रोल पंपशेजारी विठ्ठल गायकवाड हे आपल्या दुचाकीवर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी चालले असताना पाठीमागून येणार्‍या चारचाकी वाहनाने भरधाव वेगात येऊन गायकवाड यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात मयत गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना खाजगी वाहनाने नगर येथे रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताची खबर देण्यात आली. मयत गायकवाड यांच्या डोक्याला मार लागून ते रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. दरम्यान पाठीमागून धडक देऊन चार चाकी वरील वाहन चालक वाहन सोडून पसार झाला.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

या अपघाताची फिर्याद नवनाथ बाबासाहेब गायकवाड राहणार ब्राह्मणी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी चारचाकी वाहनाच्या अज्ञात वाहन चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Accident Car collides with two-wheeler, one killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here