Home महाराष्ट्र Accident: घाटात शंभर फुट दरीत कार कोसळली

Accident: घाटात शंभर फुट दरीत कार कोसळली

Accident car crashed into a hundred feet in the gorge

Raygad | रायगड: मुंबई एक्स्प्रेस वे वर खोपोलीनजीक बोर घाटात एक चार चाकी कार १०० फुट दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरुन आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणा-या चार चाकीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या चार चाकीत तिघे जण असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे.

हा अपघात झाल्याचे समजताच या परिसरातील सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने शंभर फुट दरीत उतरुन अपघातग्रस्तांना बाहेर काढले. या अपघातात तिघे जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Accident car crashed into a hundred feet in the gorge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here