Home Accident News १०० फूट खोल दरीत कोसळली कार; चौघांचा मृत्यू

१०० फूट खोल दरीत कोसळली कार; चौघांचा मृत्यू

Car Accident: पर्यटनाला जात असताना कार थेट १०० फुट खोल कोसळल्याची दुर्घटना, चार जणांचा मृत्यू.

Accident Car falls into 100 feet deep gorge Four died

अमरावती: सुटीचा दिवस असल्याने पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करून स्वतःची कार घेऊन चिखलदरा येथे पर्यटनासाठी निघाले असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात  चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळहा भीषण अपघात झाला आहे. मयत व जखमी हे आंध्रप्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुटी असल्याने फिरायच्या निमित्ताने चिखलदरा येथे पर्यटनासाठी सात जण कारमध्ये निघाले होते. परंतु पर्यटनस्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांच्या कारचा अपघात झाला. घाट रस्ता असल्याने येथे कार अनियंत्रित होऊन कार थेट खोल दरीत कोसळली.

चिखलदरा येथे पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला असून यात घटनास्थळी चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी घटनास्थळी मदतकार्य सुरू जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. मात्र अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Accident Car falls into 100 feet deep gorge Four died

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here