Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनरची दुचाकीला धडक, आईचा मृत्यू तर मुलगा जखमी

अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनरची दुचाकीला धडक, आईचा मृत्यू तर मुलगा जखमी

Ahmednagar, Rahuri Accident: कंटनेरने दुचाकीवर चाललेल्या मायलेकांना समोरून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना.

Accident Container collides with bike, mother dies and son injured

राहुरी: नगर-मनमाड महामार्गावर राहुरीच्या सूतगिरणी जवळ कंटनेरने दुचाकीवर चाललेल्या मायलेकांना समोरून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातात कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील महिला ठार झाली असून तीचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

आज सकाळी नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका येथील सोमनाथ विलास चौधरी हा आपल्या आईसोबत दुचाकीवरून (MH 17 AJ 8733) नगर तालुक्यातील निमगाव येथे नातेवाईकांच्या वर्षश्राद्धासाठी जात असताना राहुरी सुतगिरणीजवळ कंटनेरने त्यांच्या दुचाकीला जोराची समोरून धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील सोमनाथ चौधरी याची आई लता विलास चौधरी (वय ४९) या जागेवर ठार झाल्या. तसेच सोमनाथ चौधरी हा गंभिररित्या जखमी झाल्याने त्याला नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत राहूल विलास चौधरी यांनी राहुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

दररोज करू शकता १ हजार ते १५ हजार रुपयांची कमाई ते ही घरबसल्या ऑनलाईन | Earn Money Online

Web Title: Accident Container collides with bike, mother dies and son injured

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here