अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनरने महिलेला चिरडले, महिला जागीच ठार- Accident
Ahmednagar | parner Accident News: कंटेनरने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना.
पारनेर: अहमदनगर पुणे महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज बुधवार वाडेगव्हाण शिवारात कंटेनरने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज बुधवारी दुपारी तीन चार वाजेच्या दरम्यान मोटारसायकल (क्रमांक एमएच 16 सीझेड 0526) या गाडीवर मुलगा आई व छोटी नात मोटरसायकलने शिरुरकडून नगरच्या दिशेने येत असतांना वाडेगव्हाण (ता. पारनेर) शिवारात हॉटेल फाऊटन समोर कंटेनर (क्रमांक एमएच 12 एचडी 5321) याने मोटारसायकला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील मुलगा व नात एका बाजुला पडले तर आई एका बाजुला पडल्याने त्यांना कंटेनरने चिरडले. यात गंगुबाई बाबुराव सातपुते (वय 58 रा. देऊळगाव सिद्धी ता. नगर) या जागीच ठार झाल्याची माहिती सुपा पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती समजताच सुपा पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाली. व सदर मृतदेह रुग्णवाहीकेने पारनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी नेण्यात आला. तर सदर घटनेतील कंटेनर चालक हा गाडी सोडून फरार झाल्याचे सुपा पोलिसांनी सांगितले.
Web Title: Accident container crushed the woman, killing her on the spot