Home पुणे देवदर्शनावरुन येताना रिक्षा थेट विहिरीत, नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू, संसार सुरु होण्यापूर्वीच काळाचा...

देवदर्शनावरुन येताना रिक्षा थेट विहिरीत, नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू, संसार सुरु होण्यापूर्वीच काळाचा घाला

Pune Accident: सासवड येथे रिक्षाचा भीषण अपघात, नव दाम्पत्यासह युवतीचा मृत्यू, रिक्षा अंधारात विहिरीत कोसळली, संसार सुरु होण्यापूर्वीच काळाचा घाला.

Accident Devdarshan, the rickshaw fell into the well, and three people including the newly married couple died

पुणे: जिल्ह्यातील सासवडजवळ विहिरीत रिक्षा पलटी होऊन नवदाम्पत्यासह एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना  घटना रात्रीच्या अंधारात घडली आहे. रिक्षा महामार्गा लगतच्या खोल विहीरीत कोसळली.. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. यात अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण या घटनेत वाचले आहेत.

या अपघातात एकूण तिघेजण जागीच ठार झाले आहेत. रोहित विलास शेलार (वय २३ ) ,वैष्णवी रोहित शेलार( वय १८) या नवदाम्पत्याचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपला. रोहित शेलार आणि वैष्णवी शेलार या नववधू वरांवर काळाने घाला घातला. या नव दाम्पत्यासह श्रावणी संदीप शेलार (वय १७) या तरुणीचा या अपघातात मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव धायरी येथील नवदाम्पत्य आणि त्यांचे नातेवाईक हे रिक्षा क्रमांक एमएच १२ क्यूई ७७६० मधून सोमवारी दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी जेजुरी येथे देव दर्शनासाठी गेले होते. रात्री जेजुरी येथुन घरी परतत असताना सासवड शहरानजीकच्या गोटेमळा परिसरात रिक्षाचे ब्रेकफेल झाल्याने चालक आदित्य मधुकर घोलप (वय २२ रा. धायरी पुणे याचे नियंत्रण सुटले. यानंतर ही रिक्षा महामार्गा लगतच्या खोल विहीरीत कोसळली. रात्री अंधारात ही रिक्षा निर्जन ठिकाणी कोसळून रिक्षातील सर्वजण खोल विहीरीत पाण्यात पडले.

मात्र, आज सकाळी महामार्गावरून जाणा-या वाहनचालकांना आरडाओरडा व बचावासाठीच्या हाक ऐकू आल्याने हा अपघात झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव त्वरित दाखल झाले.व बचाव कार्याला सुरवात झाली. या दुर्घटनेत सुदैवाने रिक्षा चालक आदित्य घोलप आणि शितल संदिप शेलार हे बचावले आहेत. त्यांना उपचारासाठी सासवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरु केल्यानंतर अपघातग्रस्त रिक्षा विहिरीतून बाहेर काढण्यात आली आहे. पोलीस अधिक  तपास करीत आहेत.

Web Title: Accident Devdarshan, the rickshaw fell into the well, and three people including the newly married couple died

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here