Home Accident News एसटी बसने कंटेनरला जोराची धडक दिल्याने अपघात, बसमधील १३ जण जखमी

एसटी बसने कंटेनरला जोराची धडक दिल्याने अपघात, बसमधील १३ जण जखमी

Ahmednagar, Parner Bus Accident:  एसटी बसने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात १३ जण जखमी झाले असून यातील ७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Accident due to ST bus hitting container hard

पारनेर: अहमदनगर – पुणे महामार्गावर वांघुडे शिवारात एसटी बसने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बस मधील 13 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली असून यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

जखमी झालेल्यांमध्ये अमोल भांबरे (22, रा. साक्री, ता धुळे), मिताली देवकांत पाटील (42), रूपाली संजय दाळवे (41), प्रणव संजय दळवे (8) प्रेरणा निवृत्ती सोनवणे (20), हेमांगी देवकांत पाटील(42, रा. सर्व अंमळनेर, ता. जळगाव), अंजना निवृत्ती पवार (61, रा. मालेगाव, जि. नाशिक), मंगल देवराम वाघमोडे (40, रा. राहुरी. जि. अहमदनगर), नवनीत सुखलाल करंदीकर (43), मनीषा नवनीत करंदीकर (37), धिरज नवनीत करंदीकर (16) रा. सर्व धायरी, पुणे), जिजाबाई पोपट पाटील (75, रा. धामणगाव, ता. जि. जळगाव), प्रतिक्षा बाळासाहे बनकर (21, रा. राहता, जि. अहमदनगर) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

याप्रकरणी कंटेनर चालक सय्यद अहमद जाफर सय्यद (रा. लक्ष्मीनगर, येरवडा जि. पुणे) याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सय्यद हे गुरुवारी दुपारी त्यांच्या कंटेनर एमएच 12 एमवाय 223261 हा नगर एमआयडीसी मधून माल भरून पुण्याच्या दिशेने जात होता. दुपारी 3 वाजेच्या सुमारास (वाघुंडे खुर्द,ता. पारनेर) गावाच्या शिवारात पाठीमागून येणारी अंमळनेर ते पुणे MH 06 S 8730 या क्रमांकाच्या एसटी बसने अचानक कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली, अपघातात एसटी बसमधील 13 प्रवाशी जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी खाजगी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना औषधोपचारासाठी खासगी दवाखान्यात पाठविले. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Accident due to ST bus hitting container hard

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here