Home संगमनेर संगमनेर: डंपरची दुचाकीला धडक

संगमनेर: डंपरची दुचाकीला धडक

Breaking News | Sangamner Accident: डंपरची दुचाकीला जोराची धडक, दुचाकीवरील दोघे जखमी.

Accident Dumper hit the bike

संगमनेर : नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर राजापूर (ता. संगमनेर) गावाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ डंपरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.०३) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास झाला. अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला. डंपरचालक हा नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावरून ढंपर घेऊन नाशिककडून येणाऱ्या सर्व्हिस रस्त्याने संगमनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतरत असताना डंपरची दुचाकीला जोराची धडक बसली.

दुचाकीचालक पुरूष आणि पाठीमागे बसलेली महिला धडकेने रस्त्याच्या बाजूला उडून पडले, ते प्रवास करीत असलेल्या दुचाकीहून डंपर गेल्याचे दुचाकीचा चुराडा झाला होता. दोघेही बाजूला पडल्याने बचावले, त्यांना मार लागला. खासगी वाहनातून दोघा जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

Web Title: Accident Dumper hit the bike

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here