Home Accident News अहमदनगर: घाटात मळीचा टँकर कोसळला- Accident

अहमदनगर: घाटात मळीचा टँकर कोसळला- Accident

Ahmednagar Accident: करंजी घाटात मळी घेऊन मुंबईला जात असलेला टैंकर खोल दरीत कोसळला.

Accident fertilizer tanker collapsed in the ghat

करंजी: नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात मळी घेऊन मुंबईला जात असलेला टैंकर खोल दरीत कोसळला. या अपघातात टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. टँकरचालक सुदैवाने बचावला.

नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अतिशय चढ असलेल्या ठिकाणी मराठवाड्यातील सेलू, पाथरी येथून मुंबईला मळी घेऊन जाणारा टैंकर ब्रेक फेल झाल्याने मागे येऊन घाटाचा कठडा तोडून खोल दरीत कोसळला. शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात टँकरमध्ये चालक एकटाच होता. राजकुमार पाल (वय ३५, रा. बिहार) हा टँकर चालक बचावला. टैंकर ३-४ पलट्या खाऊन दरीतील मोठ्या दगडला अडकला. घटनेची खबर मिळताच पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, सतीश खोमणे करीत आहेत.

Web Title: Accident fertilizer tanker collapsed in the ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here