Home नाशिक शिर्डीकडे दर्शनासाठी जाणाऱ्या पाच सायकलस्वरांना जीपने चिरडले, दोघांचा मृत्यू

शिर्डीकडे दर्शनासाठी जाणाऱ्या पाच सायकलस्वरांना जीपने चिरडले, दोघांचा मृत्यू

Sinnar Accident:   सिन्नर येथील पाच सायकल स्वारांना पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा एसयूव्ही या भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना घडली.  या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक.

Accident Five cyclists on their way to Shirdi were crushed by a jeep, two killed

सिन्नर: सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे गावाजवळ आज सकाळी सात वाजेच्या सुमारास सायकल वरून शिर्डीकडे जाणाऱ्या सिन्नर येथील पाच सायकल स्वारांना पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा एसयूव्ही या भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात (Accident) सिन्नर येथील दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला असून आणखी एक जणाची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतर दोघे सायकलस्वार देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

आदित्य महेंद्र मिठे व कृष्णा संतोष गोळेसर अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यासह सिन्नर शहरातील लोंढे गल्ली भागात राहणारे पाच तरुण आज दि 11 पहाटे सायकल वरून शिर्डी कडे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास पाथरे गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा एसयुव्ही क्रमांक (MH48/AK6286) ही जीप थेट या सायकल स्वारांच्या घोळक्यात शिरल्याने अपघात झाला.

त्यांना चिरडत जीपने पुढे ओढत नेले. ही जीप देखील रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत पलटी झाली. अपघाताची माहिती समजल्यावर पाथरे गावातील तरुणांनी तसेच वावी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. वावी, पाथरे, पांगरी येथील रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जखमी झालेल्या सर्वांना सिन्नर येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघात करणाऱ्या महिंद्रा वाहनातील तीन प्रवाशांना देखील उपचारासाठी मुंबईकडे हलवण्यात आल्याची माहिती मिळते.

Web Title: Accident Five cyclists on their way to Shirdi were crushed by a jeep, two killed

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here