Home Ahmednagar Live News अहमदनगर: नातीच्या लग्नाला जात असताना काळाचा घाला, महिलेचा मृत्यू तर दोघे जखमी

अहमदनगर: नातीच्या लग्नाला जात असताना काळाचा घाला, महिलेचा मृत्यू तर दोघे जखमी

Ahmednagar Accident: नातीच्या लग्नाला जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने नेवासा तालुक्यातील तामस वाडी येथील एका महिलेचा मृत्यू (Death) झाला तर दोघे जखमी झाल्याची घटना.

Accident grandson's wedding, a woman died and two others were injured

नेवासा | Nevasa: नगर-औरंगाबाद महामार्गावरिल दहेगांव-बिडकिन मार्गावर मुरमी शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत नेवासा तालुक्यातील तामसवाडीतील एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार दि.२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील अमोल राजेंद्र खोपडे (वय ४५ वर्षे) व शोभा रवींद्र खोपडे (वय ३५ वर्षे) यांच्यासोबत मोटारसायकलवर भीमाबाई हिरामन खोपडे (वय ६५ वर्षे) रा. तामसवाडी ता. नेवासा, जि. अहमदनगर हे बिडकिन येथे राहणाऱ्या नातीच्या लग्नाला जात होत्या.

गंगापूर तालुक्यातील दहेगांव-बिडकिन या राज्य महामार्गावर दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास इसारवाडी फाट्याकडून बिडकिनच्या दिशेने निघालेल्या त्यांच्या दुचाकीला मुरमी शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात भीमाबाई हिरामन खोपडे या गंभीर तर अन्य दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारार्थ उपस्थितांनी गंगापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

मात्र उपचार सुरू असताना भीमाबाई हिरामन खोपडे (वय ६५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. अमोल राजेंद्र खोपडे व शोभा रवींद्र खोपडे यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शेख सलीम करीत आहेत.

Web Title: Accident grandson’s wedding, a woman died and two others were injured

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here