Accident: तीन गाड्यांचा विचित्र भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू
पुणे | Accident: पुणे अहमदनगर महामार्गावर रविवारी रात्री तीन वाहनांचा भीषण अपघात घडला. तीन गाड्यांच्या विचित्र अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात पुण्यानजीकच्या शिक्रापूरजवळ झाला आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
हा अपघात इतका भीषण होता की 3 गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा अधिक तपास शिक्रापूर पोलिसांकडून सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात असताना अनियंत्रित झालेल्या ट्रकने विरुद्ध दिशेला येऊन कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना जोरदार धडक दिली.
ट्रक हा तळेगाव ढमढेरे गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर फरार झाला असून पुढील तपास पोलिस यंत्रणा करत आहेत
फोर व्हीलर वाहन आणि दोन्ही टू व्हीलर नगरकडून पुण्याच्या दिशेने चालले असताना ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन कार आणि दोन बाईकला धडकला.
या भीषण अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत.
अपघातात बाईकवरील विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे (रा. वासुंडे, ता. पारनेर, जि. नगर) या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मयता मधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. जखमींची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत होते.
Web Title: Accident horrific crash of three vehicles, killing four people