Home अहमदनगर कंटेनर व छोटा हाती धडकेत भीषण अपघात, १ जण ठार तर ९...

कंटेनर व छोटा हाती धडकेत भीषण अपघात, १ जण ठार तर ९ जण जखमी

Ahmednagar | Newasa News: महामार्गावर कंटेनर व छोटा हाती यांच्यात झालेल्या अपघातात (Accident) एकजण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना.

accident in a collision between container and small hand, 1 person killed and 9 injured

नेवासा : अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनर व छोटा हाती यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील बाभुळवेढा परिसरात घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की लोखंडी सळ्या घेऊन चाललेला कंटेनर (क्र. एमएच १२ एनएच ३१९३) छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरकडे जात होता. बाबुळवेढा परिसरात एका टाटा एस या टेम्पोला तो मागून धडकला व रस्त्याच्या शेजारी असलेल्या उसात जाऊन उलटला. या अपघातात कंटेनरचा चालक अशोक जाधव (वय ३०, रा. निमगाव मायंबा, ता. शिरूर कासार, जि. बीड) हा जागेवरच ठार झाला. या अपघातात इतर आठ महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये कंटेनरचा क्लीनर विशाल राठोड व नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील महिला जखमी झाल्या आहेत. या महिला आपल्या रोजच्या कामावरून टेम्पोतून घरी परतत होत्या. विमल शेंडे, लक्ष्मीबाई शेंडे, वर्षा शेंडे, नंदाबाई शेंडे, अरुणा सुभाष शेंडे, आशाबाई शेंडे, जिजाबाई शेंडे, प्रतिभा मंडलिक या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.बी. काळोखे व वाय.सी. आव्हाड करत आहेत.

Web Title: accident in a collision between container and small hand, 1 person killed and 9 injured

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here