Home Accident News दोन कारच्या धडकेत भीषण अपघात, चार मित्रांचा मृत्यू

दोन कारच्या धडकेत भीषण अपघात, चार मित्रांचा मृत्यू

Ahmednagar Accident:  वळणाचा अंदाज न आल्याने ही कार दुभाजक ओलांडून समोरुन नगरच्या दिशेने जाणार्‍या कारवर धडकली. धडक इतकी भीषण होती की चौघांचा जागीच मृत्यू.

accident in two car collision, four friends died

देवगड फाटा: नगर-औरंगाबाद महामार्गवर गंगापूर तालुक्यातील कायगाव नजिक कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणार्‍या कारला धडकून झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला. 5 जण जखमी झाले आहे. चौघेही मयत बजाजनगर (वाळूज ता. गंगापूर) येथील आहेत. दुसरी कार अमरावतीहून श्रीक्षेत्र देवगडकडे येत होती.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अहमदनगरहून औरंगाबादकडे बजाजनगर (वाळूंज) येथील व चौघा व्यावसायिक मित्रांची एक कार (एमएच 20 सीएस 5982) जात होती. रात्री साडेआठच्या सुमारास कायगावजवळील वळणाचा अंदाज न आल्याने ही कार दुभाजक ओलांडून समोरुन नगरच्या दिशेने जाणार्‍या कारवर धडकली. धडक इतकी भीषण होती की चौघांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये रावसाहेब मोटे (वय 56), सुधीर पाटील (वय 45), भावसिंग गिरासे व रतन बेडवाल (38, चौघेही रा. वाळूज महानगर) अशी मयताची नावे आहेत

अपघातातील दुसर्‍या कारमधील (एमएच 27 बीझेड 3889) शशिकला कोराट (वय 70), सिद्धार्थ जंगले (वय 24), हेमंत जंगले (वय 55), छाया जंगले (वय 35), शंकुतला जंगले (व 70) हे पाच जण जखमी झाले. या कारमधील प्रवासी अमरावतीहून श्रीक्षेत्र देवगड येथे दर्शनासाठी मुक्कामी जात होते. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: accident in two car collision, four friends died

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here