Home Accident News संगमनेर तहसीलदार निकम यांच्या वाहनाला अपघात- Accident

संगमनेर तहसीलदार निकम यांच्या वाहनाला अपघात- Accident

Sangamner Accident:  हाता-पायाला मार : खड्डा चुकविताना नियत्रण सुटले, तहसीलदार निकम यांच्या वाहनाला अपघात.

Accident involving Sangamner Tehsildar Nikam's vehicle

संगमनेर : संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या वाहनाला अपघात झाला. यात तहसीलदार निकम किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारार्थ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना घरी सोडले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. मंगळवारी (दि.६) सकाळी नाशिक-पुणे महामार्गावर कन्हे घाटात हा अपघात घडला. यात वाहनाचे नुकसान झाले आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तहसीलदार निकम हे वाहन चालवत संगमनेरच्या दिशेने येत असताना मोठा खड्डा चुकविण्याचे प्रयत्नात त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले वाहन घाटातील कठड्याला जाऊन धडकले. इतर वाहनचालकांनी त्यांना अपघातग्रस्त वाहनांतून बाहेर काढले.

निकम यांच्या हाता-पायाला मार लागला. याबाबत माहिती मिळताच महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी हे अपघातस्थळी पोहोचले. निकम यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम

नाशिक-पुणे महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून यापूर्वीदेखील अपघात घडले आहेत. असे असले तरीही योग्य पद्धतीने खड्डे बुजविले जात नाहीत.

Web Title: Accident involving Sangamner Tehsildar Nikam’s vehicle

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here