Home Accident News वानराची भरधाव दुचाकीवर उडी, अन एकुलता एक मुलाचा मृत्यू

वानराची भरधाव दुचाकीवर उडी, अन एकुलता एक मुलाचा मृत्यू

Nanded News:  वानराने अचानक धावत्या दुचाकीवर उडी मारली. यात दोघेही खाली पडल्याने दुचाकीस्वार चालक जागीच ठार झाल्याची घटना.

Accident monkey jumps on a speeding bike, an only child dies

नांदेड: पुलावर बसलेल्या वानराने अचानक धावत्या दुचाकीवर उडी मारली. यात दोघेही खाली पडल्याने दुचाकीस्वार चालक जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील राजापूर पाटीजवळ सोमवारी घडली.

धर्माबाद शहरातील २६ वर्षीय अभिषेक होमबहादूर तमू (रा. केशवनगर, किशनगड अजमेर, ह. मु. धर्माबाद व ३० वर्षीय कृष्णा बाबुशा शेळके (रा. शांतीनगर, धर्माबाद) हे दोघेजण खासगी कामानिमित्त नांदेडला मोटारसायकलने जात होते. राजापूर पाटीजवळील पुलावर बसलेल्या वानराने अचानक त्यांच्या भरधाव मोटारसायकलवर उडी मारली. यामुळे दोघेही खाली पडले. चालक अभिषेक याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला, तर मागे बसलेला कृष्णा शेळके गंभीर जखमी झाला आहे. त्याला निझामाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अभिषेक तमू याने धर्माबादेत गेल्या वर्षीपासून फरशीचे दुकान सुरू केले होते. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

Web Title: Accident monkey jumps on a speeding bike, an only child dies

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here