Home Accident News Accident: मोटारसायकल व आयशर टेम्पोचा भीषण अपघात, पती-पत्नी ठार

Accident: मोटारसायकल व आयशर टेम्पोचा भीषण अपघात, पती-पत्नी ठार

Ahmednagar Accident News: मोटारसायकल व आयशर टेम्पोचा भीषण अपघात.

accident of motorcycle and Eicher Tempo, husband and wife killed

अहमदनगर: विसापूर अहमदनगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात शनिवारी (दि. २१) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास मोटारसायकल व आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला तर पत्नीचा नगरला उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या मोटारसायकला पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. या धडकेत दौंड येथील मूळ रहिवासी व सध्या नगर येथील सिद्धार्थनगर येथे राहणारे संभाजी मानसिंग मोहिते (वय ५९) हे जागीच ठार झाले. त्यांच्या पत्नी प्रियंका संभाजी मोहिते (वय ५६) यांचा नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी प्रियंका मोहिते यांना उपचारासाठी कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. बेलवंडी पोलीस ठाण्यात खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत संभाजी मोहिते यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथे पाठविण्यात आला. तर प्रियंका मोहिते यांना उपचारासाठी नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान प्रियंका यांचा मृत्यू झाला.

Web Title: accident of motorcycle and Eicher Tempo, husband and wife killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here