शिर्डीहून शनि शिंगणापूरला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात
Breaking News: ट्राव्हलरच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने नाशिकहून तुळजापुरला जाणारी ही एसटी मागून ट्रॅव्हलर बसवर आदळली.
कोल्हार : शिर्डीहून शनि शिंगणापूरला जाणाऱ्या ट्रॅव्हलर (क्र. एम एच ३ डीव्ही -७६ ८७) एस टी बसला ओ०- हरटेक करून पुढे जाणाऱ्या ट्राव्हलरच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने नाशिकहून तुळजापुरला जाणारी बस (क्र. एम एच २० सी एल ४१ १५) ही एसटी मागून ट्रॅव्हलर बसवर आदळली.
रविवारी सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान ही घटना राहुरीजवळ घडली, मात्र बस चालक जाधव यांनी प्रसंगावधान ठेवून ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. यात १० प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये ५२ प्रवासी होते.
बस वाहक गुरव यांनी प्रवाशांना दिलासा देत दुसऱ्या बसने पुढच्या प्रवासास पाठवले. दुर्दैवाची बाब म्हणजे आज तुळजापूर या गाडीचा अपघात झाला, तसाच तुळजापूर- नाशिक बसचा नांदूर शिंगोटेजवळ दुसरा अपघात झाला.
Web Title: Accident of ST bus going from Shirdi to Shani Shingnapur
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News