नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वारांना चिरडत एसटीने घेतला पेट, ४ ते ५ जणांचा मृत्यू
Accident Breaking: नाशिक सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात, बसने तीन ते चार दुचाकीस्वरांना चिरडत नेत पेट घेतला. या अपघातात चार पाच जणांचा मृत्यू अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला आहे. या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं. इतकंच नाही तर या बसने समोर असलेल्या एका एसटी बसला देखील जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला. त्याचवेळी बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या घेतल्या.
Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढलं. या अपघातात आतापर्यंत चार ते पाच दुचाकीस्वारांचा जणांचा मृत्यू झाला असून बसमधील अनेक प्रवाशी गंभीर झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Web Title: accident on Nashik Pune highway, ST caught fire crushing bikers, 4 to 5 people died
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App