Home Accident News विटांचा ट्रॅक्टर अंगावर उलटून एकाचा जागीच मृत्यू

विटांचा ट्रॅक्टर अंगावर उलटून एकाचा जागीच मृत्यू

Ahmednagar Accident News: उतारावर ब्रेक न लागल्याने विटांचा ट्रॅक्टर अंगावर उलटून एकाचा जागीच मृत्यू झाला.

Accident One died on the spot after the brick tractor overturned

जामखेड : जामखेडपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरी गावाजवळ उतारावर ब्रेक न लागल्याने विटांचा ट्रॅक्टर अंगावर उलटून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिवाजी संपत काळे (६०, रा. पाटोदा गडाचे, ता. जामखेड) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील सांगवी येथून विटा घेऊन खर्डा येथे चाललेला ट्रॅक्टर राजुरी गावच्या उतारावर असताना ट्रॅक्टरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाने ट्रॅक्टरवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असताना उलटला. यावेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागे ट्रॉलीत विटांवर बसलेले शिवाजी संपत काळे यांच्या अंगावर विटा पडल्याने विटाखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती जामखेड येथील पोलिस नाईक अजय साठे घटनास्थळी पोहोचले. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपले मित्र निखिल कुमकर व उपस्थितांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेत आणून ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे दाखल केला. वैद्यकीय अधिकारी मनोज शिंदे आणि किशोर बोराडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.  अधिक  तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजय साठे करत आहेत.

Web Title: Accident One died on the spot after the brick tractor overturned

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here