Home Accident News Accident: विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Accident: विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Accident One dies of electric shock

राहुरी | Accident: राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील नाजीम पापा देशमुख यांचा घरात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देशमुख यांच्या पत्नी, आई व मुले लग्नासाठी परगावी गेले होते. घरी परतल्यावर नजीम हे मयत अवस्थेत आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, प्रभाकर गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. रविवारी दुपारी शवविचेदन करून मृतदेह परिवाराच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने बारागाव नांदूर परिसरात शोक व्यक्त होत आहे.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Accident One dies of electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here