Home अहमदनगर Accident:  संगमनेर रस्त्यावरील अतिक्रमणाने तरुणाचा घेतला बळी

Accident:  संगमनेर रस्त्यावरील अतिक्रमणाने तरुणाचा घेतला बळी

Accident:  टँकरच्या मागील चाकाखाली सापडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

Accident Sangamner road claimed the life of a young man

श्रीरामपूर: श्रीरामपूर – संगमनेर रस्त्यावरील नगरपालिकेच्या बंद पडलेल्या नाक्या समोर. फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या, २४ वर्षीय संतोष दत्तात्रय राजगुरू नावाच्या युवकांचा, सायंकाळी सव्वा ५ वाजेच्या सुमारास. रस्त्याने जात असतांना, रस्त्यावर थांबलेल्या एम एच १९ एस ४४३२ क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने, दरवाजाच्या धक्का लागून शेजारून जात असलेल्या, एम एच १७ बी वाय ७१३१ क्रमांकाच्या टँकरच्या मागील चाकाखाली सापडल्याने संतोष दत्तात्रय राजगुरू याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने, शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदरचा आपघात हा संगमनेर रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमामुळे झाला असून अतिशय वर्दळीचा हा रस्ता असतांना देखील. सदर रस्त्यावरील अनेक व्यापारी तसेच गॅरेज व्यावसायिकांनी, आपले दुकाने १० ते १५ फूट पुढे आणल्याने. त्यांच्याकडे येणारे ग्राहक हे रस्त्यावर गाड्या लावत असल्यामुळे यापूर्वी देखील अनेक आपघात होऊन. अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरी देखील याची कोणत्याही प्रकारची दाखल प्रशासनने न घेतल्याने. संतोष राजगुरू याला आपले प्राण गमवावे लागले असून. संतोष याच्या पश्चात वडील, आई, पत्नी, भाऊ, भावजाई असा परिवार असून. काही महिन्यांपूर्वी संतोष विवाह झाला होता. तसेच शहरात नम्र व मनमिळाऊ स्वभावा करिता राजगुरू कुटुंबाने ओळख निर्माण केली असून. आपल्या उत्कृष्ट फोटोग्राफी मुळे, अतिशय कमी वयात मयत संतोष राजगुरू संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होता.

Web Title: Accident Sangamner road claimed the life of a young man

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here