समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच, गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने ३ जणांचा मृत्यू
Ahmednagar News: समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा आज धोत्रे शिवारात भीषण अपघात (Accident), अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
शिरसगाव | अहमदनगर : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा आज धोत्रे शिवारात भीषण अपघात झाला असून नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या होंडाई वरना कारचा अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बकरी ईदचा सण साजरा करून नांदेड वरून मुंबईकडे जात असतांना गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमीक माहिती समोर येत आहे.
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात हुंडाई वरना गाडी क्रमांक MH-04-JV-2430 ह्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
मोहम्मद जावीद अख्तर मोहम्मद सलिमोद्दिन – वय ५५, अरकुमुद्दीन जावीद अख्तर वय २२, शामीमबेगम मोहम्मद जावीद अख्तर वय ३६ सर्व सध्या राहणार मुंब्रा मुंबई व मुळगाव नांदेड अशी मृतांची नावे आहेत.
या अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असतानाच आज पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच आठवड्यात तीन घटना यासमृद्धी महामार्गावर होऊन दोन अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Web Title: Accident session continues on Samriddhi highway, 3 people died in Accident
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App