Home Accident News जायकवाडीच्या कालव्यात भरधाव कार कोसळली; व्यापाऱ्याचा मृत्यू

जायकवाडीच्या कालव्यात भरधाव कार कोसळली; व्यापाऱ्याचा मृत्यू

Jalna News: माल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची कार काळव्यात कोसळून भीषण अपघात (Accident), व्यापाऱ्याचा मृत्यू.

Accident speeding car fell into the canal of Jayakwadi Death of a merchant

जालना : जालना जिल्ह्यातील भार्डी गावाजवळ भुसार माल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची कार कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात व्यापऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांनी तातडीने या व्यापाऱ्याची  गाडी कालव्यातून बाहेर काढली मात्र, त्या पूर्वीच व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता.

नंदू सोनाजी राजगुरू (वय ३८) असे या अपघात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. राजगुरू हे अंबड तालुक्यातील रुई या त्यांच्या गावाहून दुपारी भार्डी मार्गे तीर्थपुरीकडे जात होते.

नंदू सोनाजी राजगुरू हे घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील बाजार समितीच्या यार्डात कापूस व भुसार माल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. नंदू राजगुरू हे सोमवारी दुपारी अंबड तालुक्यातील रुई या त्यांच्या गावाहून दुपारी भार्डी मार्गे तीर्थपुरीकडे जात होते. यावेळी त्यांची कार अचानक जायकवाडीच्या डाव्या कालव्यात कोसळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार कालव्यात कोसळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांची गाडी त्यांनी बाहेर काढली. मात्र, राजगुरू यांचा मृत्यू झाला होता.

आडत व्यापारी नंदू राजगुरू यांच्या आडत दुकानात तीर्थपुरी व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेकडो क्विंटल सोयाबीन आगाऊ जमा करून ठेवले आहे. राजगुरू यांच्याकडे अनेकांचे देणे असल्याची चर्चा आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे देणेकऱ्यांची व सोयाबीन ठेवलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग जमा झाले आहेत.

Web Title: Accident speeding car fell into the canal of Jayakwadi Death of a merchant

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here