Accident: बसने चिरडून विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर
Accident: दुचाकीवरून पडल्याने सिटी बस खाली चिरडून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना.
अमरावती : अमरावतीत सिटी बसने चिरडुन विद्यार्थींनीचा जागीच मृत्यू झाला आहे. अमरावती शहरातील अशासकीय भियंता महाविद्यालय समोरील घटना घडली. नेहा इंगोले (वय २१) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.
नेहा इंगोले ही आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर जात असताना विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालया समोर दुचाकीला ब्रेक लावला. यानंतर रस्त्यावर दोघेही पडले. यावेळी मागून येणाऱ्या सिटी बसचे मागील चाक नेहाच्या डोक्यावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला. नंतर नेहाला खाजगी रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
सध्या नेहाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला आहे. तर त्या तरुणाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली.
Web Title: Accident student died on the spot after being crushed by a bus
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App