‘समृद्धी’वर आरोपी घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात, महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू
आरोपी घेऊन जाणाऱ्या पोलिसांचे वाहन ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर पांढरकवढा गावानजीक घडली. अपघातात महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी.
वर्धा : परभणी येथून आरोपी घेऊन नागपूर येथे जाणारे हरियाणा राज्यातील पंचकुला येथील पोलिसांचे वाहन ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर पांढरकवढा गावानजीक सकाळी घडली. अपघातात महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी झाला आहे.
नेहा चव्हाण असे मृत्यू झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरीयाणा येथील पंचकुला पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे तीन कर्मचारी परभणी येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेऊन एचआर. ०३ जी.व्ही. १७८२ क्रमांकाच्या बोलेरो पोलिस वाहनाने नागपूरकडे जात होते. समृद्धी महामार्गाने जात असताना पांढरकवडा गाव परिसरात पोलिस वाहन समोरील ट्रकला पाठिमागून धडकले.
या भीषण अपघातात पोलिस वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलिस कर्मचारी व आरोपी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक, संदीप खरात हे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. तसेच जाम महामार्ग पोलिसही अपघातस्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तसेच आरोपी ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली.
Web Title: accident to police vehicle carrying accused on ‘Samriddhi’, woman police inspector dies
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App