Home अहमदनगर ट्रॅक्टरचे टायर बदलताना टायर फुटल्याने  दोन ऊस तोडणी कामगार जखमी

ट्रॅक्टरचे टायर बदलताना टायर फुटल्याने  दोन ऊस तोडणी कामगार जखमी

Accident Two cane harvesters were injured when a tire burst

राहुरी | Accident: आरडगांव येथे प्रसाद शुगर कारखान्याचे दोन ऊस तोडणी कामगार उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर बदली करत असतांना अचानक टायर फुटून जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे हॉटेल किनारा शेजारी प्रसाद शुगर कारखान्याच्या तीन टोळ्या कार्यरत आहेत. त्यामध्ये बाहेर गावावरुन पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत आलेले उस तोडणी कामगारच्या टोळी मुक्कादम जिजाबराव चव्हाण व दयाराम सोनवणे व हे दोघे ऊस तोडणी कामगार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नादुरुस्त असलेले उस वाहतूक जाणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर बदली करत असतांना हि घटना घडली. दोघांच्या पायाला जबर मार लागल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident Two cane harvesters were injured when a tire burst

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here