Home Accident News अहमदनगर: टँकरने लष्करी वाहनास धडक दिल्याने दोन जवान जखमी

अहमदनगर: टँकरने लष्करी वाहनास धडक दिल्याने दोन जवान जखमी

Accident Two soldiers were injured when a tanker hit a military vehicle

Ahmednagar Accident | अहमदनगर: अहमदनगर- दौंड महामार्गावर अरणगाव (ता. नगर) शिवारात बाह्यवळण रस्ता चौकात टँकरने लष्करी वाहनास धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात आर्मड कोअर सेंटरमधील दोन जवान जखमी झाले आहेत.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कराच्या अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटरमध्ये नियुक्तीस असलेले संजीवकुमार परणसिंग गुर्जर (वय 29 मूळ रा. मध्यप्रदेश) हे लान्स नायक जयवंत तुलछसिंग यांच्यासमवेत लष्कराची कारमधून दौंड महामार्गाने अहमदनगरच्या दिशेने येत होते. अरणगाव शिवारात बाह्यवळण रस्ता चौकात त्यांना टँकरने चालकाच्या बाजुने जोराची धडक दिली.  या अपघातात संजीवकुमार आणि जयवंत हे दोघे जखमी झाले आहेत. संजीवकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविणे, दुखापतीस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक जयश्री बडे हे करीत आहेत.

Web Title: Accident Two soldiers were injured when a tanker hit a military vehicle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here