Home अहमदनगर अहमदनगर: मोटारसायकल झाडावर आदळून दोघे जागीच ठार

अहमदनगर: मोटारसायकल झाडावर आदळून दोघे जागीच ठार

Ahmednagar News: सुपा पारनेर रोडवर हंगा शिवारात काल सायंकाळी मोटारसायकलवरील दोघे झाडावर आदळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघे जागीच ठार.

Accident Two were killed on the spot when the motorcycle hit a tree

पारनेर  | Parner:  सुपा पारनेर रोडवर हंगा शिवारात काल सायंकाळी मोटारसायकलवरील दोघे झाडावर आदळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघे जागीच ठार झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवार (25 मे) रोजी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान सुपा पारनेर रोडवर हंगा शिवारातील आमकडा भागात मोटारसायकल  क्रमांक एमएच 28 एजी 2792 या गाडीवरुन दोन जण पारनेरवरुन सुप्याच्या दिशेने येत होते. हंगा शिवारातील आमकडा भागातील सोंडकर वस्ती जवळील रस्ता वळणाचा अंदाज न आल्याने मोटारसायकलस्वराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडावर जाऊन आदळले. गाडीचा वेग जास्त असल्याने ते रस्त्याच्या विरूद्ध दिशेला जाऊन पडले. यात हे दोघेही जबर जखमी होऊन जागीच ठार झाले आहेत.

या घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही अपघातग्रस्थांना तात्काळ पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हे दोघे परप्रांतीय आहे. परंतु अद्याप त्यांची नावे समजु शकले नाही. त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुपा पोलिस करत आहेत.

Web Titie: Accident Two were killed on the spot when the motorcycle hit a tree

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here