Home Accident News संगमनेर: मोटारसायकलवरुन पडून तरुणीचा मृत्यू

संगमनेर: मोटारसायकलवरुन पडून तरुणीचा मृत्यू

Sangamner Crime: भरधाव वेगाने जाणार्‍या मोटारसायकल वरून पडल्याने (Accident) तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना.

Accident young woman died after falling from a motorcycle

संगमनेर: भरधाव वेगाने जाणार्‍या मोटारसायकल वरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.30) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नगर रस्त्यावरील गणपती मंदिरासमोर घडली. याप्रकरणी मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  गौरव मच्छिंद्र लेबे (रा. देवाचा मळा, संगमनेर) हा आपल्या मोटारसायकलवरून भरधाववेगाने नगर रस्त्यावरून जात होता. रेणुका पांडुरंग खरात (वय 25, रा. इंदिरानगर) या तरुणीला मोटारसायकलवर घेऊन तो चालला होता. नगर रस्त्यावरील गणपती मंदिरासमोर त्यांची मोटारसायकल आली असता या ठिकाणी मोटारसायकलवर बसलेली रेणुका खरात ही खाली पडली. या अपघातामध्ये तिला गंभीर मार लागला. तिला उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला.

याबाबत मयत युवतीची आई बेबी पांडुरंग खरात या महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गौरव मच्छिंद्र लेबे रा. देवाचा मळा संगमनेर याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 650/2023 भारतीय दंड संहिता कलम 304 (अ), 279, 337, 338 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब), 177 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धिंदळे हे करत आहे.

Web Title: Accident young woman died after falling from a motorcycle

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here