Home अहमदनगर श्री शनैश्वर देवस्थानच्या पुजाऱ्याचा अपघाती मृत्यू, घाटात काळाचा घाला

श्री शनैश्वर देवस्थानच्या पुजाऱ्याचा अपघाती मृत्यू, घाटात काळाचा घाला

Ahmednagar News: इमामपूर घाटात शनिशिंगणापूर देवस्थानच्या पुजाऱ्याचा अपघाती (Accidental) मृत्यू.

Accidental death of the priest of Shanaishwar temple

अहमदनगर : नगरहून शनिशिंगणापूरला जात असताना नगर तालुक्यातील इमामपूर घाटात श्री शनैश्वर देवस्थानच्या पुजाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास झाली.

श्रीकांत मधुकर जोशी (वय ५०, रा. भिस्तबाग चौक, पाइपलाइन रोड, नगर) असे मयत पुजाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इमामपूर घाटात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न दोन वाहने भरधाव वेगाने समोरून आली. त्यामुळे जोशी यांच्या मोटारसायकलला या वाहनाने धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांचा मुलगा अथर्व याने त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

जोशी हे मूळचे सोनई (ता. नेवासा) येथील रहिवासी होते. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी नगरमध्ये राहत होते. शनिवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास ते मोटारसायकलवरून शनिदेवाच्या पूजेसाठी शिंगणापूकडे जात होते.

याबाबत जिल्हा रुग्णालयातील सहायक फौजदार मरकड यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलिस नाईक संदीप पितळे हे करीत आहेत.

Web Title: Accidental death of the priest of Shanaishwar temple

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here