Home अहमदनगर चुलत बहिणीच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

चुलत बहिणीच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Accused sentenced to life imprisonment in cousin's murder case

अहमदनगर | Murder Case: चुलत बहिणीचा विवाह होऊ नये तसेच तिच्यावर वाईट नजर ठेवून आरोपीने चुलत बहिणीस रॉकेल टाकून पेटविले त्यात तिचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये नगर तालुक्यातील कामरगाव येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

मारुती अर्जुन ठोकळ वय ३५ रा. कामरगाव ता. नगर असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी याची चुलत बहिण हिच्यावर वाईट नजर होती. तिचा विवाह होऊ नये म्हणून आरोपी तिला फोन करून त्रास देत होता. २४ मार्च २०१६ रोजी घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने तिच्या घरात घुसला व तिच्याशी वाद केला. त्यानंतर आरोपीने घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. तिने आरडाओरडा केल्याने घाबरून त्याने गोधडीच्या सहायाने विझाविले. स्टोव्ह चा भडका होऊन तू भाजली असे सगळ्यांना सांग नाहीतर तुझ्या घरच्यांचे वाटोळे करीन अशी धमकी दिली. आरोपीनेच तिला नगरला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. न्यायालयात याप्रकरणी पोलीस अधिकारी, उपचार करणारे डॉक्टर यांचे साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.

जिल्हा न्यायाधीश माधुरी बरालीया यांनी आरोपीस दोषी ठरत आजन्म कारावासाची व ५० हजाराचा दंड ठोठाविला आहे.

Web Title: Accused sentenced to life imprisonment in cousin’s murder case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here