Home क्राईम संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून एक वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून एक वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

Sangamner News:  एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abusing) करून एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला आळेफाटा पोलिसानी रविवारी (ता. ३० एप्रिल) रोजी पिंपळवंडी परिसरात ताब्यात घेतले आहे.

accused, who has been absconding for a year after abusing a minor girl

संगमनेर | पुणे : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला आळेफाटा पोलिसानी रविवारी (ता. ३० एप्रिल) रोजी पिंपळवंडी परिसरात पकडले आहे. त्यानंतर आरोपीला घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नवनाथ आनंदा चव्हाण (वय ४० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.

घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, घारगाव शिवारात एका अल्पवयीन मुलीवर नवनाथ आनंदा चव्हाण (रा. खैरदरा कोठे बुद्रुक) याने २३ एप्रिल २०२२ रोजी अत्याचार केला होता. त्यामुळे घारगाव पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती  कायदा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार झाला होता.

फरार असलेला आरोपी नवनाथ चव्हाण हा जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात येणार असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी चव्हाण याला रविवारी पिंपळवंडी परिसरात पकडले. त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी घारगाव पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. घारगाव पोलिसांनी धाव घेत चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान नवनाथ चव्हाण हा आरोपी एक वर्षांपासून फरार होता.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीला आळेफाटा पोलिसांनी पुणे जिल्ह्यात पकडले.. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार, विनोद गायकवाड, पंकज पारखे, पोपट कोकाटे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, सचिन राहणे, प्रशांत तांगडकर या पथकाने केली आहे.

Web Title: accused, who has been absconding for a year after abusing a minor girl

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here