Home मनोरंजन मोठा धक्का! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

मोठा धक्का! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

Actress Jacqueline Fernandez's assets worth Rs 7.27 crore seized from ED

Jacqueline Fernandez ED:  सक्तवसुली संचालनालयाने (ED) सुकेश चंद्रशेखर विरुद्ध खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त (seized) करण्यात आली आहे. जॅकलीन फर्नांडिस यांच्या अंतर्गत 7.12 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचा समावेश यामध्ये आहे.

सुकेशने जॅकलिनला 5.71 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. तर वृत्तानुसार, त्याने जॅकलिनच्या (Jacqueline) जवळच्या कुटुंबीयांना US डॉलर 173,000 आणि जवळपास 27,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा देण्यात आला आहे.

सुकेश सध्या पाच वर्षे जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात अडकलेला आहे. 4 एप्रिल रोजी त्याला ईडीने या प्रकरणात अटक केली होती. तर, गेल्या वर्षी, गृह मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 215 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी सुकेशला ईडीने अटक केली होती.

Web Titile: Actress Jacqueline Fernandez’s assets worth Rs 7.27 crore seized from ED

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here