Home अकोले Adhala Dam: आनंदाची बातमी: आढळा धरण ओव्हरफ्लो तर भंडारदरा..

Adhala Dam: आनंदाची बातमी: आढळा धरण ओव्हरफ्लो तर भंडारदरा..

Adhala Dam: 16 गावांच्या 3914 हेक्टर क्षेत्रातील लाभक्षेत्रात आढळा धरण पुर्णत्वाने भरल्याने आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

Adhala Dam overflows then Bhandardara

अकोले | Adhala Dam: अकोले, संगमनेर, सिन्नर तालुक्यातील 16 गावांचे भवितव्य असणा-या आढळा धरणाने पूर्णक्षमतेन पाणीसाठा पार केला आहे. यंदा आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. .

1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेचे देवठाणचे आढळा धरण शुक्रवारी पहाटे  ६ वाजता पुर्ण भरले आणि सांडव्यावरुन पाणी आढळा नदीत झेपावले. धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यावरुन पाणी नदीपात्रात वाहू लागले.

संगमनेर, अकोले, सिन्नर तालुक्यातील 16 गावांच्या 3914 हेक्टर क्षेत्रातील लाभक्षेत्रात आढळा धरण पुर्णत्वाने भरल्याने आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आाणि निळवंडे धरणाच्या पाणलोटात आषाढसरींचे तांडव नृत्य सुरू असल्याने डोंगरदर्‍यातील धबधब्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले असून छोट्या नद्या, ओढेनालेही सैराट झाल्याने दोन्हीही धरणांमध्ये जोरदार नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 6946 दलघफू (62.93) झाला होता. आज हा साठा 65 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे.

जोरदार पाऊस होत असल्याने अनेक शेतांचे बांध फुटले आहेत. त्यात काही ठिकाणी भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भातरोपे पाण्यात असल्याने ती सडण्याची भीती व्यक्त होत आहे.

भंडारदरात गत 24 तासांत तब्बल 784 दलघफू पाणी आले. त्यामुळे काल गुरूवारी सकाळी या धरणातील पाणीसाठा 6549 दलघफू (59.32 टक्के) झाला होता. निळवंडेत 284 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा काल सकाळी 5188 दलघफू (62.35टक्के) झाला होता. सायंकाळी हा साठा 5419 दलघफू (65.05 टक्के) झाला. आज या धरणातील पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहचण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Adhala Dam overflows then Bhandardara

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here