Home महाराष्ट्र संतापजनक! मित्राच्या आजारपणाचा फायदा घेत पत्नीवर केला बलात्कार

संतापजनक! मित्राच्या आजारपणाचा फायदा घेत पत्नीवर केला बलात्कार

Rape Case:  एका ३५ वर्षीय महिलेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केल्याची घटना. पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. आरोपीने पीडितेला धमकावत तिच्याकडून तब्बल १२ लाख रुपये देखील उकळले.

advantage of his friend's illness, he rape his wife

महाड : महाड तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. कोथेरी येथे एका ३५ वर्षीय महिलेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून महाड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काशिनाथ कृष्णा पवार, आशा काशिनाथ पवार आणि अभी काशिनाथ पवार, अशी गुन्हा  दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी हे मुंबईच्या चेंबूर परिसरातील रहिवाशी आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी काशिनाथ पवार हा तिच्याच पतीचा मित्र आहे. पीडितेचा पती आजारी असल्याने तो आपल्या पत्नीसह पीडितेच्या घरी आला होता.

यावेळी तुझ्या पतीवर देवदेवस्की केल्याचे सांगून आरोपी काशिनाथ आणि त्याच्या पत्नीने पीडित महिला आणि तिच्या पतीच्या अंगावरून तांदुळ उतरवले. त्यानंतर सोबत कागदाच्या पुडीतून आणलेले पावडर त्याने पीडित महिला आणि तिच्या पतीला पाण्यात मिसळून दिले.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

दरम्यान, पावडरचे पाणी पिताच फिर्यादी महिला आणि तिचा पती बेशुद्ध झाले. यानंतर आरोपी काशिनाथ याने फिर्यादी महिलेवर बलात्कार (Rape) केला. इतकंच नाही तर त्याने पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तब्बल सहा महिने पीडितेवर बलात्कार केला.

इतकंच नाही, तर आरोपीने पीडितेला धमकावत तिच्याकडून तब्बल १२ लाख रुपये देखील उकळले. आरोपी काशिनाथ याचे कृत्य दिवसेंदिवस वाढतच असल्याने अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून महाड शहर पोलिसांनी आरोपी काशिनाथ पवार त्याची पत्नी आशा पवार आणि मुलगा अभी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: advantage of his friend’s illness, he rape his wife

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here