Home अकोले अगस्ती कारखाना निवडणूक निकाल: जनतेचा कौल कोणाला जाणून घ्या

अगस्ती कारखाना निवडणूक निकाल: जनतेचा कौल कोणाला जाणून घ्या

Agasti Sugar Factory Election Result: अगस्ती कारखाना निवडणूक निकाल. 

Agasti Sugar Factory Election Result

अकोले: माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माकप नेते डॉ. अजित नवले, कम्युनिस्ट नेते कॉ. कारभारी उगले, आर पी आय चे नेते विजयराव वाकचौरे आदींच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळात सरळ चुरशीची लढत आहे. आज मतमोजणी पार पडत आहे. 


अपडेट: 

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत सर्वात शेवटचा निकाल भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातील आला असून त्यात शेतकरी समृद्धी मंडळाचे सचिन रामनाथ दराडे यांनी शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार सुभाष बंडू काकड यांचा पराभव केला आहे.

शेतकरी समृद्धी मंडळाने सर्वच्या सर्व 21 जागांवर दैदिप्यमान विजय संपादन करत शेतकरी विकास मंडळाचा दारुण पराभव केला आहे.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत शेतकरी समृद्धी मंडळाचे इतर मागासवर्गीय मतदार संघातील उमेदवार कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे हे विजयी झाले आहेत.

पांडे यांनी अकोले नगरपंचायतचे उपाध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचा पराभव केला आहे. उत्पादक गटातील सर्वच्या सर्व 15, सोसायटी मतदार संघातील 1 व महिला राखीव मतदार संघातील 2 अशा 18 जागांवर दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता इतर मागासवर्गीय मतदार संघातील जागेवरही विजय संपादन केला आहे.

इतर मागासवर्गीय मतदार संघातील उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे-

१) वडजे बाळासाहेब (शेतकरी विकास मंडळ) – 2554 (पराभूत)

2) पांडे मिनानाथ ( शेतकरी समृद्धी मंडळ) – 4283 (विजयी)

3)संजय देशमुख (अपक्ष) – 188 (पराभूत)

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत आ.डॉ किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माकपचे नेते डॉ. अजित नवले, भाकपचे नेते कॉ कारभारी उगले,आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव वाकचौरे…

यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळाने उत्पादक गटातील सर्वच्या सर्व 15 व सोसायटी मतदार संघातील 1 अशा 16 जागांवर दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता महिला राखीव मतदार संघातील 2 जागांवरही विजय संपादन केला आहे. शेतकरी समृद्धी मंडळाच्या उमेदवार सौ.नवले सुलोचना व सौ.वाकचौरे शांताबाई या दोन्हीही महिला उमेदवार विजयी झाल्या असून त्यांनी शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवार मालुंजकर आरती व नाईकवाडी रंजना यांचा पराभव केला आहे.

महिला राखीव मतदार संघातील उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे-

१) नवले सुलोचना अशोक (शेतकरी समृद्धी मंडळ ) -4546(विजयी)

२) नाईकवाडी रंजना भाऊसाहेब ( शेतकरी विकास मंडळ) -2624(पराभूत)

३) मारुती आरती नानासाहेब ( शेतकरी विकास मंडळ) -2623(पराभूत)

४) वाकचाैरे शांताबाई दगडु ( शेतकरी समृद्धी मंडळ) -4222(विजयी)

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत सर्वात धक्कादायक निकाल आत्ताच हाती आला आहे. शेतकरी विकास मंडळाचे नेते, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री मधुकरराव पिचड याचा अनुसूचित जाती जमाती मतदार संघात त्यांचे पारंपरिक विरोधक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी पराभूत केले आहे.

28 वर्ष चेअरमनपद भूषविलेले माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना सहकारातील निवडणुकीत प्रथमच कारखान्याच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

*अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल.*

देवठाण गट

१) आंबरे गोरख लक्ष्मण (अपक्ष) ५७

२) उगले चंद्रभान फकिरबुवा ( अपक्ष) १६०

३) उगले नामदेव बाळासाहेब ( विकास) २६४२

४) बोंबले बादशहा दत्तु ( समृद्धी) .४१४४ (विजयी)

५) वाकचाैरे भाऊसाहेब नामदेव ( विकास) २५७६

६) वाकचाैरे जालिंदर वामन ( विकास) २५३९

७) वाकचाैरे रामनाथ बापूराव ( समृद्धी) ४१९७ (विजयी)

८) शेळके सुधीर कारभारी ( समृद्धी) ४००७ (विजयी)

*अगस्ति साखर कारखाना निवडणूक अपडेट*

*कोतुळ गट :-
१) घुले सुभाष बाबुराव ( अपक्ष) ८५
२) देशमुख मनोज शिवनाथ ( समृद्धी)४३०६
३) देशमुख राजेंद्र नानासाहेब ( विकास)२६४५
४) लहामटे यमाजी सखाराम ( समृद्धी)४४६५
५)शेळके कैलास सीताराम ( समृद्धी) ४३५३
६) शेळके रावसाहेब तुकाराम ( विकास)२४६३
७) सावंत बाळासाहेब गणपत ( विकास)२४२३

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

अगस्ती सहकारी साखर कारखाना २०२२ ते २०२७ निवडणूक निकाल
आगर उत्पादक गट
१) आरोटे अशोक झुंबरराव ( समृद्धी) —-४४१४ (विजयी)
२) आरोटे सुधाकर काशिनाथ ( विकास)–२७११
३) कोटकर सुनिल सुकदेव ( विकास) —-२३९२
४) नाईकवाडी परबत नामदेव ( समृद्धी)–४४१४ (विजयी)
५) फोडसे संपत कारभारी (अपक्ष) —-१७३
६) शेटे किसन रावजी ( विकास) —- २५२८
७) शेटे विकास कचरु ( समृद्धी) — ४१३८(विजयी

अधिकृत जाहीर झालेल्या सोसायटी मतदार संघाच्या निकालात कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अकोले गटात जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती, कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष कैलासराव वाकचौरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व विद्यमान संचालक मच्छिन्नद्र धुमाळ, बुवासाहेब नवले मल्टिस्टेट को ऑप.क्रेडिट सीसायटीचे अध्यक्ष व काँग्रेसच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले यांनी विजयी सलामी

शेतकरी समृद्धी मंडळाचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे-

अशोक देशमुख (विजयी) 4110 मते

पाटीलबा सावंत (विजयी )3991 मते

प्रदिप हासे (विजयी)3968मते

भाऊसाहेब खरात (पराभूत)2830 मते

वैभव देशमुख-पिचड (पराभूत)2677 मते

प्रकाश नवले (पराभूत)2541 मते

प्रकाश रामभाऊ हासे-195 मते ( पराभूत)

शेतकरी समृद्धी मंडळ

श्री.मच्छिंद्र धुमाळ (आघाडीवर) 4153मते श्री.विक्रम नवले (आघाडीवर)4219मते श्री.कैलासराव वाकचौरे (आघाडीवर)4282मते

शेतकरी विकास मंडळ

श्री.माणिक देशमुख (पिछाडीवर)2660मते श्री.रामनाथ वाकचौरे (पिछाडीवर)2311मते श्री.संदीप शेटे (पिछाडीवर)2603 मते

सीताराम गायकर पाटील यांचा विजय 

सिताराम पा. गायकर साहेब 41

राजेंद्र डावरे पाटील – 6

बाद मते 2

एकूण मते 49

 

Web Title: Agasti Sugar Factory Election Result

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here