Home अहमदनगर Ahmednagar Bribe Case: शेती महामंडळाचा कर्मचारी लाच लुचपतच्या जाळ्यात

Ahmednagar Bribe Case: शेती महामंडळाचा कर्मचारी लाच लुचपतच्या जाळ्यात

Ahmednagar Bribe Case: राखणदार लाच लुचपतच्या जाळ्यात तीन हजार घेताना पकडले : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागणी.

Agriculture corporation employee in the net of bribe

श्रीरामपूर | Shrirampur: शेती महामंडळाचा राखणदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. सातबारा उताऱ्यात वारस म्हणून आईचे नाव लावण्यासाठी शेती महामंडळाच्या राखणदार कर्मचाऱ्याने ५ हजारांची लाचेची मागणी करून तडजोडीने ठरलेली ३ हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात या राखणदारास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंगचा कर्मचारी काल लाच लुचपतच्या जाळेत तीन हजारांची लाच घेतांना अलगद अडकला असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नवनाथ अशोक थोरात, वय -३८ असे त्याचे नाव असून तो शेती महामंडळात राखणदार पदावर कार्यरत होता.

नवनाथ अशोक थोरात (वय ३८, राखणदारअसे राखणदार  नैमित्तिक कामगार महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, टिळकनगर , मळा, रा. उक्कलगाव) असे राखणदारकर्मचाऱ्यांचे नाव आहे. सन २००६ मध्ये तक्रारदार यांच्या आईचे वारस म्हणून नाव ७/१२ उताऱ्यावर नोंद लावण्यात आलेली होती. परंतु २००७ पासून ७/१२ उताऱ्यावर आईचे नाव नसल्याचे तक्रारदार यांना २०१३ मध्ये लक्षात आले. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांच्या आईचे नावे उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर यांचेकडे अपील अर्ज केला होता. सन २०२० पर्यंत कोणताही आदेश पारित झाला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा आईच्या नावे उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडे वारस हक्काप्रमाणे ७/१२ वर नाव नमूद करण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये अर्ज केला. त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

सदर जमीन तक्रारदार स्वतः कसत आहेत. २९ जानेवारी २०२३ रोजी आलोसे यांनी तक्रारदार यांना फोन करून सांगितले की, सदर जमीन महाराष्ट्र शेती महामंडळाच्या नावे आहे. ती तू कसू नको. जर ती जमीन तुला कसायची असेल तर तू मला ५००० रुपये दिल्यास मी तुला सदर जमीन कसू देईल असे म्हणून लाच मागितली. याबाबतची तक्रार केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे दिली. त्यानुसार बेलापूर नाका प्राची फरसाण दुकानाजवळ लाचेचा सापळा लावला. आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष ३ हजार रुपये लाच स्वीकारताना त्या राखणदाराला रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईत नाशिकच्या परिक्षेत्र पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, नाशिक अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलिस नाईक रमेश चौधरी, अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, चालक हारुन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Agriculture corporation employee in the net of bribe Case

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here