Ahmednagar News: हायप्रोफाइल सेक्स रॅकेटवर (Sex Racket) छापा टाकत एमआयडीसी पोलिसांनी दोन पीडित मुलींची सुटका.
अहमदनगर: नवनागापूर येथील चेतना कॉलनीत सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटवर छापा टाकत एमआयडीसी पोलिसांनी दोन पीडित मुलींची सुटका केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली असून याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
नगर-मनमाड रोडवरील नवनागापूर येथील चेतना कॉलनीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली. त्यांनी वेश्या व्यवसायावर छापा टाकण्यासाठी सापळा रचला. पोलिस पथकाने काही कर्मचाऱ्यांना बनावट ग्राहक बनवून सदर महिलेच्या राहत्या घरी पाठविले. महिला राहत असलेल्या घरातच वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी दोन पीडित महिलांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर केले.
याप्रकरणी महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखालील नितीन उगलमुगले, विष्णू भागवत, राजेंद्र सुद्रीक किशोर जाधव, उमेश शेरकर, नवनाथ दहीफळे, सचिन हरदास, मनिष काळे, सोनाली जाधव आदींच्या पथकाने केली.
Web Title: Ahmednaagr High profile sex racket busted
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App