Home Accident News पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करीत असताना पहाटे तरुणासोबत घडले ते धक्कादायक

पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करीत असताना पहाटे तरुणासोबत घडले ते धक्कादायक

Ahmednagar Accident:  पोलीस  तयारी करत असताना  तरुणाचा मृत्यू,  बाबुर्डी घुमट वाळकी रस्त्यावरील घटना, अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना.

Ahmednagar Accident Died on the spot after being hit by an unknown vehicle

नगर: धावण्याचा सराव करत असलेल्या वीस वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १४) सकाळी ६:३० च्या सुमारास नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ते वाळकी जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

योगेश बबन पंचमुख (वय २०, रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. बाबुर्डी घुमट गावातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारे काही तरुण सध्या पोलिस व आर्मी भरतीसाठी तयारी करत आहेत. त्यामुळे दररोज पहाटे ते धावण्याच्या सरावासाठी बाबुर्डी ते वाळकी रस्त्यावर जात असतात.

बुधवारी (दि. १४) पहाटे मयत योगेश व त्याच्यासोबत अन्य दोन जण, असे तिघे व्यायामासाठी गेलेले होते. बाबुर्डी गावापासून वाळकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही गावच्या शिवेजवळ ते थोडा वेळ रस्त्याच्या कडेला विश्रांतीसाठी बसलेले होते.

त्याच वेळी सकाळी ६:३० च्या सुमारास नगरहून भरधाव वाळकीकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या तिघांपैकी योगेश पंचमुख याला जोराची धडक दिली. त्याच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहनचालक तेथे न थांबता वाहनासह पसार झाला. जखमी योगेश यास तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

त्याच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Ahmednagar Accident Died on the spot after being hit by an unknown vehicle

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here