अहमदनगर ब्रेकिंग: जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Ahmednagar | अहमदनगर: जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस कर्मचारी हरिभाऊ मांडगे (वय 40, रा. पिंपरी गवळी, ता. पारनेर) यांनी आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि. 29) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.
हरिभाऊ मांडगे यांच्यावर कौटुंबिक वादातून 2018 आणि 2022 मध्ये दोन गुन्हे सुपा (ता. पारनेर) पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहेत. या गुन्ह्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
पोलिस अधीक्षक कार्यालयातील गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या दालनासमोर अंगावर ज्वालाग्राही रसायन ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्यांनी त्याला वाचविले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Web Title: Ahmednagar Attempt of police self-immolation in District Superintendent of Police office