अहमदनगर |श्रीगोंदा | Ahmednagar Breaking: विक्री करण्याच्या उद्देशाने एक गावठी कट्टा व चार जिवंत बाळगणार्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. किरण अरूण दरेकर (वय 33 रा. करंदी ता. शिरूर जि. पुणे) असे केलेल्याचे नाव आहे.
श्रीगोंद्यातील बेलवंडी फाटा येथे पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा व चार जिवंत काडतुस असा एकूण 25 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटकेयांनी दिली.
किरण दरेकर हा बेलवंडी फाटा परिसरात कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यांनी सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस अंमलदार विजय वेठेकर, भाऊसाहेब कुरूंद, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
या पथकाने बेलवंडी फाटा येथील साई गार्डन हॉटेलसमोर सापळा लावून संशयित इसमाला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने किरण दरेकर असे नाव सांगितले. त्याच्या अंगझडतीमध्ये गावठी कट्टा, जिवंत काडतुसे मिळून आली. त्यानंतर तपासात त्याने विक्रीसाठी आणले असल्याची माहिती दिली. अधिक तपास बेलवंडी पोलीस करीत आहे.
Web Title: Ahmednagar Breaking Arrested for carrying cartridges and cartridges