Home अहमदनगर जंतनाशक गोळी घेतल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू

जंतनाशक गोळी घेतल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू

Ahmednagar Chimukali dies after taking deworming pill

अहमदनगर | Ahmednagar: राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत सुरु असलेल्या मोहोमेत जंतनाशक गोळीचे सेवन केल्याने उलटी होऊन चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी नगर बीड हद्दीवरील लोणी सय्यद मीर या गावात घडली आहे.

प्रांजल अंकुश रक्ताटे वय १ वर्ष १० महिने असे या चिमुकलीचे नाव आहे. आरोग्य विभागाने १ मार्चपासून जंतनाशक गोळ्या वाटप आरोग्य कर्मचारी व आशा कर्मचारी यांच्यामार्फत सुरु केले आहे.

प्रांजलचे काका भाऊसाहेब रक्ताटे यांनी सांगितले की, लोणी सय्यद मीर या गावात आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र ते बंद असल्याने जंतनाशक गोळ्या मारुती मंदिरात आशा सेविकांच्या माध्यमातून वाटप करण्यात आल्या. पालकांच्या हाती गोळ्या देऊन मुलाना द्या असे सांगण्यात आले. त्यातील अर्धी गोळी प्रांजल हिस दुपारी दिली.  तिला गोळी दिल्यानंतर उलटी झाली व जमिनीवर कोसळली. तिला गावातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील आनंद ऋषी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारपूर्वीच तिचा मृत्यू झाला. गोळीमधील अर्धी गोळी तशीच ठेवण्यात आली आहे. जंतनाशक गोळीमुळे इतर कोणालाही त्रास झालेला नाही.

शवविचेदानाच्या अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. यातील व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. शासकीय स्तरावरून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Ahmednagar Chimukali dies after taking deworming pill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here