Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: अल्पवयीन मुलगी घरातून अचानक गायब

अहमदनगर ब्रेकिंग: अल्पवयीन मुलगी घरातून अचानक गायब

Ahmednagar Crime News: रात्री घरात झोपलेली अल्पवयीन मुलगी घरातून अचानक गायब झाल्याची घटना.

Ahmednagar Crime minor girl suddenly disappears from home

राहुरी: रात्री घरात झोपलेली अल्पवयीन मुलगी घरातून अचानक गायब झाली. याबाबत तिच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी तिची आई व बहिणीबरोबर राहते.

अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली तरुणी गेल्या एक महिन्यापासून कॉलेज बंद करून तिच्या आजोबांकडे राहायला गेली होती. काही दिवसांपूर्वी ती पुन्हा राहुरीत आली होती. दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले. दि. २० रोजी सकाळी सात वाजता आईला आपली मुलगी घरातून गायब झाल्याचे लक्षात आले. तिचा आजूबाजूला शोध घेण्यात आला. मात्र, ती मिळून आली नाही.

आपल्या मुलीचे कोणीतरी अज्ञात कारणासाठी अपहरण करून पळवून नेल्याची फिर्याद आईने राहुरी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Ahmednagar Crime minor girl suddenly disappears from home

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here