अहमदनगर: कलाकेंद्रातील नृत्यांगनेची लॉजमध्ये आत्महत्या
Ahmednagar News: अंबिका कला केंद्रातील एका नार्तिकेने जवळच असलेल्या एका लॉजवर छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
जामखेड: येथील नगर रोडवरील अंबिका कला केंद्रातील एका नार्तिकेने जवळच असलेल्या एका लॉजवर छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. २८) सकाळी सकाळी ९:३० च्या सुमारास ही घटना घडली.
रेखा सुभाष कोळी (वय ४५ रा. मांगडे चाळ, बार्शी, जि. सोलापूर. हल्ली मुक्काम आंबिका कला केंद्र जामखेड) असे आत्महत्या केलेल्या नृत्यिकेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयत महिलेसोबत हॉटेलमध्ये कोण होते याबाबत शहरात उलटसुलट चर्चा होत आहे.
नगर रोडच्या बाजूला आंबिका कलाकेंद्र असून त्याच्या समोरच्या बाजूला कृष्णा हॉटेल आहे. आत्महत्या केलेली रेखा कोळी ही नृत्यांगना कृष्णा हॉटेलच्या रूम नंब ३ मध्ये सोमवारी (दि.२७) दुपारी २:३० पासून राहात होती. मंगळवारी सकाळी रूम स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या हॉटेल मालक या घटनेतील खबर देणार तुकाराम रामराव ढोले यांच्याशी सकाळी ८:३० च्या दरम्यान संवाद साधल्यानंतर काही वेळानंतर ही घटना घडली असावी, असा अंदाज हॉटेल कृष्णाचे मालक ढोले व्यक्त केला आहे.
कोळी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान, मयत महिलेसोबत हॉटेलमध्ये कोण होते. याबाबत उलटसुलट चर्चा जामखेड शहरात सुरु आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Web Title: Ahmednagar Dancer from art center commits suicide in lodge
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App