Home अहमदनगर नांगरलेल्या शेतात मृत अर्भक आढळले

नांगरलेल्या शेतात मृत अर्भक आढळले

Ahmednagar Dead infants were found in a plowed field

राहता |  Ahmednagar:  राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर नांगरलेल्या शेतात मृत अर्भक आढळल्याचे समोर आले आहे. ते अर्भक  पूर्णपणे कुजलेले होते.

सोमवारी लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर भाऊसाहेब दिघे यांच्या नांगरलेल्या शेतजमिनीत कपड्यामध्ये गुंडाळलेले अवस्थेत काही तरी असल्याची माहिती जमीन मालकाने नागरिकांना दिली.  ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले. त्यांनी सफेद आणि हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळलेले अर्भक ताब्यात घेऊन ते प्रवरा रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी अर्भक असल्याचे स्पष्ट केले खरे पण ते कुजलेले असल्याने स्त्री की पुरुष याची स्पष्टता केली नाही. हे अर्भक आठ ते दहा दिवसापूर्वी टाकलेले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

डॉक्टरांच्या मतानुसार अर्भक पूर्ण दिवसाचे आहे व प्रसुतीनंतर लगेच ते टाकून दिले असावे. या परिसरात मात्र अलीकडे प्रसूती झालेली महिला कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे. ही स्त्री भ्रूणहत्या असावी अशीही शंका घेतली जात आहे. याबाबत लोणी पोलीस तपास करीत आहे.

Web Title: Ahmednagar Dead infants were found in a plowed field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here